घटनादुरूस्ती कलम 368

 घटनादुरुस्ती 

भाग20               कलम 368 

  • कलम 368 :- संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व पद्धत देण्यात आली आहे.
  • कलम 368 (1) :-  संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गाने या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
  • कलम 368 (2) :- घटनादुरुस्तीची पद्धत -

  1. घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते,  मात्र असे विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येणार नाही. 
  2. घटनादुरुस्ती विधेयक मंत्री / खाजगी सदस्याला मांडता येईल. यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व संमतीची आवश्यकता नाही.
  3. घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने संमत होणे गरजेचे असते. 
  4. प्रत्येक सभागृहाने हे विधेयक स्वतंत्ररीत्या पारित करणे गरजेचे असते. मतभेद झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही. 
  5. जर विधेयक संघराज्यीय तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी असेल, तर दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताबरोबर किमान निम्म्या राज्यांनी समर्थन देणे गरजेचे असते.
  6. राष्ट्रपतीला विधेयकास संमती देणे बंधनकारक असेल. ते समंती रोखून ठेवू शकत नाहीत किंवा पुनर्विचारास पाठवू शकत नाही. (हे बंधन 24 वी घटनादुरुस्ती 1971 ने टाकण्यात आले.)


  • घटनादुरुस्तीचे प्रकार 

  1. संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती -
  2. संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरुस्ती -
  3. संसदेच्या विशेष आणि घटक राज्यांच्या बहुमताने घटनादुरुस्ती -








Comments

Popular posts from this blog

इतिहास महत्त्वाचे समाजसुधारक

अर्थशास्त्र पंचवार्षिक योजना