राज्यशास्त्र भाग-16 कलम - 330 ते 342 विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट तरतूद
भाग-16 कलम - 330 ते 342
विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट तरतूद
- कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी जागा राखून ठेवणे -126 वे घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यघटनेत 104 वी घटना दुरुस्ती करण्यात आले याद्वारे लोकसभेतील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागा 2030 पर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली. लोकसभेतील एकूण 543 निर्वाचित जागांपैकी 84 जागा अनुसूचित जातीसाठी तर 47 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
- कलम 331 - लोकसभेत ॲग्लो इंडियन समाजाचे पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास राष्ट्रपती या समाजाचे जास्तीत जास्त दोन सदस्यांचे नामनिर्देशन लोकसभेवर करतात. 95 घटना दुरुस्ती 2009 नुसार हे आरक्षण 2020 पर्यंत वाढवण्यात आले होते.
- कलम 332 - विधानसभेतील जागांमध्ये अनुसूचित जाती व जमातींना जागा राखून ठेवणे.
- कलम 333 - विधानसभेत इंडियन समाजाचे पुरुषप्रधान न मिळाल्यास राज्यपाल सदस्यांचे नामनिर्देशन करतात.
- कलम 334 - राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व 70 वर्षानंतर (2020) समाप्त होणे.
- कलम 335 - सेवा व पद यावर अनुसूचित जाती व जमातीच्या हक्क.
- कलम 336 - विवक्षित सेवा मध्ये अँग्लो-इंडियन समाजाची साठी तरतूद.
- कलम 337 - ॲग्लो इंडियन समाजाचा लाभाकरिता शैक्षणिक अनुदान बद्दल तरतूद.
- कलम 338 - राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग,
- रचना - अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर तीन सदस्य (यांची नेमणूक राष्ट्रपती करतात यांचा कार्यकाळ राष्ट्रपती ठरवतील एवढा असेल.)
- 65 घटनादुरुस्ती 1990 द्वारे स्थापना.
- तर 89 वी घटनादुरुस्ती 2003 अनुसूचित जमाती पासून वेगळे करण्यात आले.
- 2004 पासून स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे.
- कलम 338 अ - राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग
- रचना - अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर तीन सदस्य (यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.)
- 65 घटनादुरुस्ती 1990 द्वारे स्थापना.
- तर 89 वी घटनादुरुस्ती 2003 अनुसूचित जमाती पासून वेगळे करण्यात आले.
- 2004 पासून स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे.
- अनुसूचित जाती व जमाती आयोगाची कार्य -
- कायद्याने मंजूर करण्यात आलेले संरक्षक उपाययोजण्याचे अन्वेषण व संनियंत्रण करणे.
- नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्यात आल्यास त्यांना बद्दल चौकशी करणे.
- सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजनात सहभागी होणे.
- कलम 338 (10) नुसार अनुसूचित जाती आयोग ओबीसी आणि अंग्लो समुदायाच्या संबंधित कार्यवाही करू शकतो.
- राष्ट्रीय अनुसूचित जाती व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, महिला आयोग यांच्या अध्यक्ष हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात.
- कलम 339 - अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन आणि अनुसूचित जमातीचे कल्याणकार्य यावर संघराज्याची नियंत्रण.
- कलम 340 - राष्ट्रीय मागासवर्ग आयोग
- स्थापना 1993 (सुरुवातीला वैधानिक दर्जा)
- 102 घटनादुरुस्ती 2018 नुसार संविधानिक दर्जा
- रचना - अध्यक्ष - सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे न्यायाधीश, 2 सदस्य - मागासवर्गीय लोकांबाबत विशेष ज्ञान असलेले, 1 महिला सदस्य, 1 सदस्य - सामाजिक कार्यकर्ता, 1 सदस्य - सचिव एकूण 5 सदस्य (यांची नेमणूक राष्ट्रपती करतात)
- अध्यक्ष व सदस्य केंद्र किंवा राज्य कडे नोकरी करण्यासाठी प्रात्र नाही.
- देशातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास पहिल्या वर्गाच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी.
- कलम 341 - अनुसूचित जाती ची तरतूद.
- कलम 342 - अनुसूचित जमातीचे तरतूद.
Comments
Post a Comment